कितीक हळवे कितीक सुंदर
किती शहाणे आपुले अंतर
त्याच जागी त्या येऊन जाशी
माझ्यासाठी,माझ्यानंतर
अवचित कधी सामोरे यावे
अन्श्वासांनी थांबुन जावे
परस्परांना त्रास,तरीही
परस्परांविण ना गत्यंतर
मला पाहुनी दडते-लपते
आणिक तरीही इतुके जपते
वाटेवरच्या फुलांस माझ्या
लावून जाते हळूच अत्तर
भेट जरी ना या जन्मातून
ओळख झाली इतुकी आतून
प्रश्न मला जो पडला नाही
त्याचेही तुज सुचते उत्तर
मला सापडे तुझे तुझेपण
तुझ्याबरोबर माझे मी-पण
तुला तोलुनी धरतो मी अन्
तू ही मजला सावर सावर
प्रेम कधी हे भरुन येता
अबोल आतून घुसमट होता
झरते तिकडे पाणी टपटप
अन्इकडे ही शाई झरझर
Tuesday, May 13, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment