बॉस .....
बॉस .....
बॉस खुप उशिरापर्यंत थांबायचा आणि वैताग आणायचा...
लाल लाल कंटाळल्या डोळ्यांनी काम करत रहायचा...
आम्ही घरी निघालो की चुकचुकायचा...
मी लग्नाळलेला... वाटायचं- 'चांगलं घरी जायचं सोडून
कसलं हे उकरून उकरून काम करत रहाणं !'...
यथावकाश माझं लग्न झालं...
नव्या नवलाईचे पक्षी घरटं सोडेना झाले...
बघता बघता 'अतिपरिचित' झाले....
आणि हळूहळू पंख सैलावत जाताना
घरटयाची हाक आत तेवढीशी तीव्र उरली नाही...
आता बॉसला 'थांब' सांगावं लागत नाही...
केबिनमध्ये तो आणि केबिनबाहेर मी
एकमेकांना सोबत करत बसलेलो असतो...
कंटाळ्यातील भागीदारांच्या समजुतदारपणाने
घरी न जाता काम करत रहाण्याची 'अनिवार्यता'
दोघांनाही आता घट्ट धरून ठेवते...
उकरून उकरून काम करत प्रश्नांशी भांडत बसण्यापेक्षा
उकरून उकरून काम करणे सोपे असते,
हे निर्जन ऑफिसमधल्या सुन्न रात्रींशी
गुपचुप कबुल केलेए आहे मी...
Thursday, May 22, 2008
Tuesday, May 13, 2008
संदीप खरेच्या कवितांची एव्हाना अनेकांना भुरळ पडलीय.'आयुष्यावर बोलू काही','नामंजूर'यांसारख्या त्याच्या आल्बम्समधल्या कविता एकदा कानावर पडल्या की त्याचं आणखी काही मिळतंय का म्हणून शोध सुरू होतो.'मौनाची भाषांतरे' या त्याच्या पहिल्याच संग्रहाची तुफान विक्री झालीय.'आयुष्यावर बोलू काही' याच नावाचा त्याचा कार्यक्रमही गर्दी खेचतोय.यंदा तर 'मटा सन्मान'आणि'झी गौरव'सारख्या पुरस्कारांनी'सवोर्त्कृष्ट गीतकार'म्हणूनही त्याला गौरवलंय. असा हा नव्या पिढीचा,ताज्या दमाचा कवी.
मेघ नसता वीज नसता मोर नाचू लागले
मेघ नसता वीज नसता मोर नाचू लागले
जाहले इतुकेच होते की तुला मी पाहिले !
गोरट्या गालांवरी का चोरटा हा रक्तिमा ?
तू मला चोरून बघताना तुला मी पाहिले !
एवढे नाजुक आहे वय तुझे माझ्या फुला
रंगदेखील पाकळ्यांवर भार वाटू लागले !
लाख नक्षत्रे उराशी,नभ तरीही हळहळे
हे तुझे नक्षत्रवैभव का धरेवर राहीले ?
पाहता तुज रंग उडूनी होई गजरा पांढरा
शल्य हे त्याच्या उरातील बघ सुगंधू लागले !
भर पहाटे मी फुलांनी दृष्ट काढून टाकली
पाहती स्वप्नी तुला जे भय तयांचे वाटले !
जाहले इतुकेच होते की तुला मी पाहिले !
गोरट्या गालांवरी का चोरटा हा रक्तिमा ?
तू मला चोरून बघताना तुला मी पाहिले !
एवढे नाजुक आहे वय तुझे माझ्या फुला
रंगदेखील पाकळ्यांवर भार वाटू लागले !
लाख नक्षत्रे उराशी,नभ तरीही हळहळे
हे तुझे नक्षत्रवैभव का धरेवर राहीले ?
पाहता तुज रंग उडूनी होई गजरा पांढरा
शल्य हे त्याच्या उरातील बघ सुगंधू लागले !
भर पहाटे मी फुलांनी दृष्ट काढून टाकली
पाहती स्वप्नी तुला जे भय तयांचे वाटले !
देवा मला रोज एक अपघात कर
देवा मला रोज एक अपघात कर
आणि तिच्या हातांनीच जखमा या भर!
कधीतरी कुठेतरी बसावी धडक
कळ मला यावी,तिला कळावे तडक!
घायाळाला मिळो एक घायाळ नजर!!
अपघाती सोंग माझे वाटावे खरे
तिला येता प्रेम मला वाटावे बरे!
दवादारू मध्ये कुठे असतो असर!!
खरी व्यथा तेव्हा मग सांगेन तिला
विचारेन जेव्हा,कुठे दुखते तुला ?'
जरा डाविकडे... जरा पोटाच्या या वर!!
टेकवता छातीवर डोके एकवार
ठोका घेई झोका उडे आभाळाच्या पार
व्यथांचाच काय... पडे जगाचा विसर!!
आणि तिच्या हातांनीच जखमा या भर!
कधीतरी कुठेतरी बसावी धडक
कळ मला यावी,तिला कळावे तडक!
घायाळाला मिळो एक घायाळ नजर!!
अपघाती सोंग माझे वाटावे खरे
तिला येता प्रेम मला वाटावे बरे!
दवादारू मध्ये कुठे असतो असर!!
खरी व्यथा तेव्हा मग सांगेन तिला
विचारेन जेव्हा,कुठे दुखते तुला ?'
जरा डाविकडे... जरा पोटाच्या या वर!!
टेकवता छातीवर डोके एकवार
ठोका घेई झोका उडे आभाळाच्या पार
व्यथांचाच काय... पडे जगाचा विसर!!
कितीक हळवे कितीक सुंदर
कितीक हळवे कितीक सुंदर
किती शहाणे आपुले अंतर
त्याच जागी त्या येऊन जाशी
माझ्यासाठी,माझ्यानंतर
अवचित कधी सामोरे यावे
अन्श्वासांनी थांबुन जावे
परस्परांना त्रास,तरीही
परस्परांविण ना गत्यंतर
मला पाहुनी दडते-लपते
आणिक तरीही इतुके जपते
वाटेवरच्या फुलांस माझ्या
लावून जाते हळूच अत्तर
भेट जरी ना या जन्मातून
ओळख झाली इतुकी आतून
प्रश्न मला जो पडला नाही
त्याचेही तुज सुचते उत्तर
मला सापडे तुझे तुझेपण
तुझ्याबरोबर माझे मी-पण
तुला तोलुनी धरतो मी अन्
तू ही मजला सावर सावर
प्रेम कधी हे भरुन येता
अबोल आतून घुसमट होता
झरते तिकडे पाणी टपटप
अन्इकडे ही शाई झरझर
किती शहाणे आपुले अंतर
त्याच जागी त्या येऊन जाशी
माझ्यासाठी,माझ्यानंतर
अवचित कधी सामोरे यावे
अन्श्वासांनी थांबुन जावे
परस्परांना त्रास,तरीही
परस्परांविण ना गत्यंतर
मला पाहुनी दडते-लपते
आणिक तरीही इतुके जपते
वाटेवरच्या फुलांस माझ्या
लावून जाते हळूच अत्तर
भेट जरी ना या जन्मातून
ओळख झाली इतुकी आतून
प्रश्न मला जो पडला नाही
त्याचेही तुज सुचते उत्तर
मला सापडे तुझे तुझेपण
तुझ्याबरोबर माझे मी-पण
तुला तोलुनी धरतो मी अन्
तू ही मजला सावर सावर
प्रेम कधी हे भरुन येता
अबोल आतून घुसमट होता
झरते तिकडे पाणी टपटप
अन्इकडे ही शाई झरझर
मी हजार चिंतानी हे डोके खाजवतो
मी हजार चिंतानी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो,घुमतो,शिळ वाजावतो
मी जुनाट दारापरी कीरकीरा बंदी
तो सताड उघड्या खिडकीपरी स्वछंदी
मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो
तो लंघून चौकट पार निघाया बघतो
डोळ्यात माझिया सूर्याहून संताप
दिसतात त्वचेवर राप ऊन्हाचे शाप
तो त्याच ऊन्हाचे झगझगीत लखलखते
घडवून दागिने सूर्यफूलांवर झुलतो
मी पायी रुतल्या काचंवरती चिडतो
तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो
मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली
नवसांची ठेवत लाच लावतो बोली
तो मूळात येतो इछा अर्पून साऱ्या
अन्धन्यवाद देवाचे घेउन जातो
मज अध्यत्माचा रोज नवा श्रुंगार
लपतो न परी चेहरा आत भेसूर
तो फक्त ओढतो शाल नभाची तरीहि
त्या शाम निळ्याच्या मोरपिसापरी दिसतो
मी हजार चिंतानी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो,घुमतो,शिळ वाजावतो
तो कट्ट्यावर बसतो,घुमतो,शिळ वाजावतो
मी जुनाट दारापरी कीरकीरा बंदी
तो सताड उघड्या खिडकीपरी स्वछंदी
मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो
तो लंघून चौकट पार निघाया बघतो
डोळ्यात माझिया सूर्याहून संताप
दिसतात त्वचेवर राप ऊन्हाचे शाप
तो त्याच ऊन्हाचे झगझगीत लखलखते
घडवून दागिने सूर्यफूलांवर झुलतो
मी पायी रुतल्या काचंवरती चिडतो
तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो
मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली
नवसांची ठेवत लाच लावतो बोली
तो मूळात येतो इछा अर्पून साऱ्या
अन्धन्यवाद देवाचे घेउन जातो
मज अध्यत्माचा रोज नवा श्रुंगार
लपतो न परी चेहरा आत भेसूर
तो फक्त ओढतो शाल नभाची तरीहि
त्या शाम निळ्याच्या मोरपिसापरी दिसतो
मी हजार चिंतानी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो,घुमतो,शिळ वाजावतो
आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो
आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो
चाकोरीचे खर्डून कागद सहीस पाठवतो
व्याप नको मज कुठलाही अन्ताप नको आहे
उत्तर कुठले मूळात मजला प्रश्न नको आहे
या प्रश्नांशी अवघ्या परवा करार मी केला
मी न छ्ळावे त्यानां , त्यांनी छळू नये मजला
बधीरतेच्या पुंगीवर मी नागोबा डुलतो
आता आता छाती केवळ भिती साठवते
डोंगर बघता ऊंची नाही खोली आठवते
आता कुठल्या दिलखुश गप्पा उदार गगनाशी
आता नाही रात्रही उरली पूर्वीगत हौशी
बिलंदरीने कलंदरीची गीते मी रचतो
कळून येता जगण्याची या इवलिशी त्रिज्या
ऊडून जाती अत्तरापरी जगण्याच्य मौजा
दारी नाही फिरकत कुठला नवा छंद चाळा
राखण करीत बसतो येथे सदॆव कंटाळा
कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो
आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो
चाकोरीचे खर्डून कागद सहीस पाठवतो
व्याप नको मज कुठलाही अन्ताप नको आहे
उत्तर कुठले मूळात मजला प्रश्न नको आहे
या प्रश्नांशी अवघ्या परवा करार मी केला
मी न छ्ळावे त्यानां , त्यांनी छळू नये मजला
बधीरतेच्या पुंगीवर मी नागोबा डुलतो
आता आता छाती केवळ भिती साठवते
डोंगर बघता ऊंची नाही खोली आठवते
आता कुठल्या दिलखुश गप्पा उदार गगनाशी
आता नाही रात्रही उरली पूर्वीगत हौशी
बिलंदरीने कलंदरीची गीते मी रचतो
कळून येता जगण्याची या इवलिशी त्रिज्या
ऊडून जाती अत्तरापरी जगण्याच्य मौजा
दारी नाही फिरकत कुठला नवा छंद चाळा
राखण करीत बसतो येथे सदॆव कंटाळा
कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो
आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो
मन तळ्यात,मळ्यात
मन तळ्यात,मळ्यात
जाईच्या कळ्यात
मन नाजुकशी मोतीमाळ
तुझ्या नाजुकश्या गळ्यात
ऊरी चाहुलींचे मृगजळ
वाजे पाचोळा उगी कशात
इथे वार्याला सांगतो गाणी
माझे राणी
आणि झुळुक तुझ्या मनात
रात भिडू लागे अंगालागी
तुझ्या नखाची कोर नभात
माझ्या नयनी नक्षत्रतारा
आणि चांद तुझ्या डोळ्यात...
जाईच्या कळ्यात
मन नाजुकशी मोतीमाळ
तुझ्या नाजुकश्या गळ्यात
ऊरी चाहुलींचे मृगजळ
वाजे पाचोळा उगी कशात
इथे वार्याला सांगतो गाणी
माझे राणी
आणि झुळुक तुझ्या मनात
रात भिडू लागे अंगालागी
तुझ्या नखाची कोर नभात
माझ्या नयनी नक्षत्रतारा
आणि चांद तुझ्या डोळ्यात...
कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे
कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे
सरताना आणि सांग सलतील ना...
गुलाबाची फुले दोन , रोज राती डोळ्यावर..
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना. .. भरतील ना...
पावसाच्या धारा धारा , मोजताना दिस सारा..
रिते रिते मन तुझे उरे..
पोटभर हसे हसे , उरातुन वेडे पिसे ..
फुल..फुल कुनात झुरे...
आता जरा अळीमेळी , तुझी माझी व्यथा निरी..
सोसताना सुखावुन हसशील ना....
कोण तुझ्या शोधातुन उभे असे सामसुम..
चिडिचुप सुनसान दिवा..
आता सांग ढळेलच अणि पुन्हा छळेलच..
नभातुन गोरा चांदवा..
चांदन्याचे कोटी कण , आठवांचे ओले सण...
रोज रोज निजभर भरतील ना...
येथे दूर देशी,माझ्या सुन्या खिडकिच्या पाशी..
झडे सर काचभर तडा...
तुच तुच, तुझ्या तुझ्या, तुझी तुझी, तुझे तुझे..
सारा सारा तुझा तुझा सडा....
पडे माझ्या वाटेतुन आणि मग काट्यातुन जातानाही पायभर मखमल ना...
आता नाही बोलायचे जरा जरा जगायचे..
माळुनिया अबोलीची फुले...
देहभर हलुदेत,विजेवर झुलुदेत,तुझ्या माझ्या विरहाचे झुले..
जरा घन झुरु दे ना,वारा गुदमुरु दे ना,तेव्हा नभ धरा सारी भिजवेल ना......
गुलाबाची फुले दोन,रोज राती डोळ्यावर ...
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना.. भरतील ना..
सरताना आणि सांग सलतील ना...
गुलाबाची फुले दोन , रोज राती डोळ्यावर..
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना. .. भरतील ना...
पावसाच्या धारा धारा , मोजताना दिस सारा..
रिते रिते मन तुझे उरे..
पोटभर हसे हसे , उरातुन वेडे पिसे ..
फुल..फुल कुनात झुरे...
आता जरा अळीमेळी , तुझी माझी व्यथा निरी..
सोसताना सुखावुन हसशील ना....
कोण तुझ्या शोधातुन उभे असे सामसुम..
चिडिचुप सुनसान दिवा..
आता सांग ढळेलच अणि पुन्हा छळेलच..
नभातुन गोरा चांदवा..
चांदन्याचे कोटी कण , आठवांचे ओले सण...
रोज रोज निजभर भरतील ना...
येथे दूर देशी,माझ्या सुन्या खिडकिच्या पाशी..
झडे सर काचभर तडा...
तुच तुच, तुझ्या तुझ्या, तुझी तुझी, तुझे तुझे..
सारा सारा तुझा तुझा सडा....
पडे माझ्या वाटेतुन आणि मग काट्यातुन जातानाही पायभर मखमल ना...
आता नाही बोलायचे जरा जरा जगायचे..
माळुनिया अबोलीची फुले...
देहभर हलुदेत,विजेवर झुलुदेत,तुझ्या माझ्या विरहाचे झुले..
जरा घन झुरु दे ना,वारा गुदमुरु दे ना,तेव्हा नभ धरा सारी भिजवेल ना......
गुलाबाची फुले दोन,रोज राती डोळ्यावर ...
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना.. भरतील ना..
नसतेस् घरी तू जेव्हा
नसतेस् घरी तू जेव्हा
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो
नसतेस् घरी तू जेव्हा!!
नभ फाटून वीज पाडावी
कल्लोळ तसा ओढावतो
ही धरा दिशा हीन होते
आन् चंद्रा पोरका होतो
नसतेस् घरी तू जेव्हा!!
येतात उन्हे दाराशी
फिर मुसून जाती मागे
खिडकीशी तबकून वारा
तव गंधा वाचून जातो
नसतेस् घरी तू जेव्हा!!
तव मिठीत विरघणार्या
मज स्मारती लाघाव वेळा
श्वासा विन हृदय आडवे
मी तसाच अगदीक होतो
नसतेस् घरी तू जेव्हा!!
तू सांग सखे मज काय
मी सांगू या घर दारा ?
सामईचा जीव उदास
माज़या सह मिन मिन मीटतो
नसतेस् घरी तू जेव्हा!!
ना अजुन झालो मोटा
ना स्वातंत्र अजूनही झालो
तुज वाचून उमगत जाते
तुज वाचून जन्मा च अडतो
नसतेस् घरी तू जेव्हा!!
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो
नसतेस् घरी तू जेव्हा!!
नभ फाटून वीज पाडावी
कल्लोळ तसा ओढावतो
ही धरा दिशा हीन होते
आन् चंद्रा पोरका होतो
नसतेस् घरी तू जेव्हा!!
येतात उन्हे दाराशी
फिर मुसून जाती मागे
खिडकीशी तबकून वारा
तव गंधा वाचून जातो
नसतेस् घरी तू जेव्हा!!
तव मिठीत विरघणार्या
मज स्मारती लाघाव वेळा
श्वासा विन हृदय आडवे
मी तसाच अगदीक होतो
नसतेस् घरी तू जेव्हा!!
तू सांग सखे मज काय
मी सांगू या घर दारा ?
सामईचा जीव उदास
माज़या सह मिन मिन मीटतो
नसतेस् घरी तू जेव्हा!!
ना अजुन झालो मोटा
ना स्वातंत्र अजूनही झालो
तुज वाचून उमगत जाते
तुज वाचून जन्मा च अडतो
नसतेस् घरी तू जेव्हा!!
एवढच ना एकटे जगू
एवढच ना.....
एवढच ना एकटे जगू
एवढच ना.....
आमच हस आमच रड
ठेवुन समोर एकटेच जगू
एवढच ना.....
रात्रीला कोण दुपारला कोण
जन्माला अवघ्या या पुरलय कोण्
श्वासाला श्वास् क्षणाला क्षण
दिवसाला दिवस जोडत जगू
एवढच ना.....
आंगणाला कुंपण् होतच कधी
घराला आंगण् होतच कधी
घराचे भास अंगणाचे भास
कुंपनाचे भासच भोगत् जगू
एवढच ना.....
आलात तर आलात तुमचेच पाय
गेलात तर गेलात कुणाला काय
स्वताच पाय स्वताच वाट्
स्वताच सोबत होउन् जगू
एवढच ना.....
मातीच घर मातीच दार
मातीच्या देहाला , मातीचे वार
मातीच खरी मातीच बरी
मातीत माती मिसळत जगू
एवढच ना.....
एवढच ना एकटे जगू
एवढच ना.....
आमच हस आमच रड
ठेवुन समोर एकटेच जगू
एवढच ना.....
रात्रीला कोण दुपारला कोण
जन्माला अवघ्या या पुरलय कोण्
श्वासाला श्वास् क्षणाला क्षण
दिवसाला दिवस जोडत जगू
एवढच ना.....
आंगणाला कुंपण् होतच कधी
घराला आंगण् होतच कधी
घराचे भास अंगणाचे भास
कुंपनाचे भासच भोगत् जगू
एवढच ना.....
आलात तर आलात तुमचेच पाय
गेलात तर गेलात कुणाला काय
स्वताच पाय स्वताच वाट्
स्वताच सोबत होउन् जगू
एवढच ना.....
मातीच घर मातीच दार
मातीच्या देहाला , मातीचे वार
मातीच खरी मातीच बरी
मातीत माती मिसळत जगू
एवढच ना.....
अताशा असे हे मला काय होते?
अताशा असे हे मला काय होते ?
कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते
बरा बोलता बोलता स्तब्ध होतो
कशी शांतता शून्य शब्दात येते
कधी दाटू येता पसारा घनांचा
कसा सावळा रंग होतो मनाचा
असे हालते आत हळुवार काही
जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा
न अंदाज कुठले न अवधान काही
कुठे जायचे यायचे भान नाही
जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा
न कुठले नकाशे न अनुमान काही
असा ऐकू येतो क्षणांचा इशारा
क्षणी दूर होतो दिशांचा पसारा
नभातून ज्या रोज जातो बुडोनी
नभाशीच त्या मागू जातो किनारा
कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते
बरा बोलता बोलता स्तब्ध होतो
कशी शांतता शून्य शब्दात येते
कधी दाटू येता पसारा घनांचा
कसा सावळा रंग होतो मनाचा
असे हालते आत हळुवार काही
जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा
न अंदाज कुठले न अवधान काही
कुठे जायचे यायचे भान नाही
जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा
न कुठले नकाशे न अनुमान काही
असा ऐकू येतो क्षणांचा इशारा
क्षणी दूर होतो दिशांचा पसारा
नभातून ज्या रोज जातो बुडोनी
नभाशीच त्या मागू जातो किनारा
दिवस असे की कोणी माझा नाही अन् मी कोणाचा नाही...
दिवस असे की कोणी माझा नाही अन् मी कोणाचा नाही....
आकाशाच्या छत्री खाली भिजतो
आयुष्यावर हसणे थुंकुन देतो
या हसण्याचे कारण उमगत नाही
या हसणे म्हणवत नाही.......!!!
प्रश्नांचे हे एकसंधसे तुकडे
त्यावर नाचे मनीचे अबलख घोडे
या घोड्याला लगाम शोधत आहे
परि मजला गवसत नाही............!!!
मी तुसडा की मी भगवा बैरागी
मद्यपिवा मी गांजेवाला जोगी
अस्तित्वाला हजार नावे देतो
परि नाव ठेववत नाही.........!!!
मम म्हणताना आता हसतो थोडे
मिटून घेतो वस्तूस्थितीचे डोळे
या जगण्याला स्वप्नांचाही आता
मेघ पालवत नाही...........!!!
दिवस असे की कोणी माझा नाही अन् मी कोणाचा नाही..........!!!
आकाशाच्या छत्री खाली भिजतो
आयुष्यावर हसणे थुंकुन देतो
या हसण्याचे कारण उमगत नाही
या हसणे म्हणवत नाही.......!!!
प्रश्नांचे हे एकसंधसे तुकडे
त्यावर नाचे मनीचे अबलख घोडे
या घोड्याला लगाम शोधत आहे
परि मजला गवसत नाही............!!!
मी तुसडा की मी भगवा बैरागी
मद्यपिवा मी गांजेवाला जोगी
अस्तित्वाला हजार नावे देतो
परि नाव ठेववत नाही.........!!!
मम म्हणताना आता हसतो थोडे
मिटून घेतो वस्तूस्थितीचे डोळे
या जगण्याला स्वप्नांचाही आता
मेघ पालवत नाही...........!!!
दिवस असे की कोणी माझा नाही अन् मी कोणाचा नाही..........!!!
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !
जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !
उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू
भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही !
तुफान पाहून तीरावर कुजबुजल्या होड्या
पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही !
हवेहवेसे दुःख तुला जर हवेच आहे
नकोनकोसे हळवे कातर बोलू काही !
उद्याउद्याची किती काळजी बघ रांगेतुन
परवा आहे उद्याच नंतर बोलू काही !
शब्द असु दे हातामध्ये काठी म्हणुनी
वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही !
जरा चुकीचे , जरा बरोबर बोलू काही
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !
उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू
भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही !
तुफान पाहून तीरावर कुजबुजल्या होड्या
पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही !
हवेहवेसे दुःख तुला जर हवेच आहे
नकोनकोसे हळवे कातर बोलू काही !
उद्याउद्याची किती काळजी बघ रांगेतुन
परवा आहे उद्याच नंतर बोलू काही !
शब्द असु दे हातामध्ये काठी म्हणुनी
वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही !
जरा चुकीचे , जरा बरोबर बोलू काही
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !
Subscribe to:
Posts (Atom)
